Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित असलेल्या परिक्रमा मार्गाच्या भूसंपादनावरून नाशिकमधील शेतकरी आणि प्रशासन समोरासमोर आले असून हा वाद गुरुवारी कमालीचा तीव्र झाला. भूसंपादन प्रक्रियेला कडाडून विरोध करत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी गुरुवारी पहाटे ५० हून अधिक ट्रॅक्टरसह थेट मंत्रालयाच्या दिशेने कूच केली. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा गरवारे पॉइंट येथे अडविल्याने मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली. अखेर पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणले; परंतु शेतकऱ्यांनी तेथेच ठिय्या आंदोलन सुरू करत प्रशासनाला ‘थेट आव्हान’ दिले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरालगत परिक्रमा मार्ग उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी दरी, मातोरी, मुंगसारा, मखमलाबाद, वासाळी, अंबड, गौळाणे आणि परिसरांतीलपोलिस ठाण्यातच ठिय्या, आंदोलन मागे घेण्यास नकार : गरवारे पॉइंटवर पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणले. मात्र, जोपर्यंत मागण्यांबाबत लेखी आणि ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत पोलिस ठाण्यातून हलणार नाही, अशी आक्रमक भूमिका साहेबराव दातीर, कैलास खांडबहाले, भास्कर उगले, दौलत चुंबळे, संजय चुंबळे, संतोष सहाणे, मधुकर थापेकर, दत्तु थापेकर आणि ओंकार देशमुख यांच्यासह सर्व शेतकऱ्यांनी घेतली आहे. जमिनी संपादित करण्यात येत आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. यात योग्य मोबदला दिला जात नाही. भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता नाही. शेतकऱ्यांशी कोणतीही पूर्वचर्चा न करता बळजबरीने जमिनी लाटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे.दोन महिन्यांपूर्वी याच मागण्यांसाठी रामकुंड परिसरात आंदोलन झाले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आठ दिवसांत निर्णय घेण्याचे, तर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रालयात बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, महिने उलटूनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला आणि गुरुवारी पहाटे ४ वाजताच साहेबराव दातीर व अॅड. कैलास खांडबहाले यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर मोर्चा रस्त्यावर उतरला.प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. बळजबरीने भूसंपादन करण्याचा प्रयत्न सुरू असून दिलेली आश्वासनेही हवेत विरली आहेत. योग्य मोबदला, न्याय्य तोडगा आणि स्पष्ट निर्णय होईपर्यंत परिक्रमा मार्गासाठी एकही शेतकरी आपली एक गुंठाही जमीन स्वेच्छेने देणार नाही साहेबराव दातीर, मुख्य प्रवर्तक, प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना. Post navigationमहाराष्ट्र चिकित्सा आस्थापना (नोंदणी व विनियमन) विधेयक, २०२६ नाशिक दिंडोरी रोडवरील प्रकार ईडीचे अधिकारी असल्याचे सांगून प्रजापती व्यापाऱ्याचे ७० लाख रुपये लुटले