Nashik : अत्याचार विरोधी कृती समिती (AVKS) च्या वतीने बलिप्रतिपदेच्या दिवशी नाशिक शहरात भव्य बळीराजा रॅली संपन्न झाली. रॅलीची सुरूवात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा शालीमार येथे अभिवादन करून झाली. ” ईडा-पिडा टळो, बळीचे राज्य येवो! अशा घोषणा देत रॅलीत शेतकरी, कामगार, महिला व बळीराजा प्रेमींनी आपला सहभाग नोंदवला होता.कार्यक्रमाचे प्रास्तविक समितीचे मुख्य निमंत्रक :- ऍड. राहुल विष्णू तुपलोंढे यांनी केले होते. यावेळी ऍड. प्रभाकर वायचळे (संविधान सन्मान वकील संघ,नाशिक), संजय पगारे (बामसेफ), प्रा. घोडेराव, गोराणे सर (अंनिस), मधुकर हांबरे, अर्जुन तात्या बोराडे (शेतकरी संघटना), मंगलताई बोढारे (धम्मनायिका महिला मंडळ), काॅ. महादेव खुडे (घंटागाडी संघटना मनपा, नाशिक), शिवश्री. प्रफुल्लजी वाघ (जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, नाशिक), डाॅ. संजय जाधव (जेष्ठ आंबेडकरी नेते), आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी करूणासागर पगारे (जेष्ठ आंबेडकरी नेते) हे होते.यावेळी ” विद्रोहीरत्न – २०२६” हा राज्यस्तरीय पुरस्कार १.अर्जुन तात्या बोराडे. २.दत्तात्रय कडलग ३.मधुकर हांबरे ४. शांताराम माळोदे (१ ते ४ शेतकरी संघटना) ५. कैलास मोरे (घंटागाडी कामगार संघटना) ६. शिवश्री.सुहास लक्ष्मण राणे. ७.आण्णासाहेब सावंत (६ ते ७ संभाजी ब्रिगेड) ८.रोहिणी जाधव (डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटर) ९. अशोका पवार (बौध्द धम्म चळवळ) १०. शरद काळे (सत्याग्रह भूमी प्रतिष्ठान नाशिक) ११. शिवदास दोंदे (संभाजी ब्रिगेड) १२. डाॅ. पाडेवार (सामाजिक कार्य) १३. दिलिप बनकर (सामाजिक कार्य) १४. डाॅ. प्रविण गांगुर्डे (पत्रकारिता,सामाजिक कार्य) १५. सुभाष मुंढे (गायरान प्रश्नी आंदोलन, मरणोत्तर ) यांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले…रॅलीचे मुख्य आकर्षण बळीराजाचा वेशभूषा केलेले, बबीराजाचा जीवंत देखावा सादर करणारे दिलीप लिंगायत सर्वांचे लक्ष वेधत होते.! रॅलीचे यशस्वीतेसाठी आयोजक :- अत्याचार विरोधी कृती समिती (AVKS), संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटना, संविधान सन्मान वकील संघ नाशिक जिल्हा, घंटागाडी कामगार संघटना, सत्याग्रही भूमी प्रतिष्ठान, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटर, नाशिक जिल्हा नशाबंदी मंच नाशिक , धम्मनायिका महिला ग्रृप, धम्ममेत्ता ग्रृप, आदि भात्रृभावी संघटनांनी कार्यक्रम यशस्वी केला आहे. Post navigationसरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीत सलग ५ दिवस सुट्ट्यांची पर्वणी; १२ आणि १३ नोव्हेंबरला रजा घेतल्यास शासकीय कार्यालये ठप्प राहण्याचा अंदाज वैजापूर हादरले: रोहित पठारे हत्याकांडात मोठी अपडेट; आरोपींची नावे, अटकेची ठिकाणे आणि थरारक घटनेचा सविस्तर प्रवास!