नाशिक / विशेष वृत्त (no1marathinews.com): कर्करोगासारख्या गंभीर आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी केंद्र सरकारने अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय दिला आहे. राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (NPPA) १३७ बिगर-अनुसूचित कॅन्सर औषधांवरील नफ्याच्या प्रमाणावर (Trade Margin) ३०% ची मर्यादा घालण्याचा ऐतिहासिक नियम लागू केला आहे. या निर्णयामुळे तब्बल १,०८५ हून अधिक ब्रँड्सच्या औषधांच्या आणि इंजेक्शन्सच्या किमती २०% ते ७०% आणि काही औषधांवर तब्बल ९६.४५% पर्यंत कमी झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कॅन्सर रुग्णांचे दरवर्षी सुमारे ३,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे वाचणार आहेत.

कॅन्सर औषध व इंजेक्शन्स: जुनी किंमत विरुद्ध नवीन सुधारित किंमत

केंद्र सरकारच्या NPPA प्राधिकरणाने जारी केलेल्या अधिकृत सुधारित दरपत्रकानुसार प्रमुख औषधे व इंजेक्शन्सचे जुने आणि नवे दर खालीलप्रमाणे आहेत:

औषध / इंजेक्शनचे नावआजार / वापरजुनी किंमत (MRP)नवीन सुधारित किंमतबचत (कपात)
Palbopro 125 mg (Palbociclib)ब्रेस्ट (स्तन) कॅन्सर₹४०,४२१.३३₹२,७२०.००९३% कपात
ABIRONE 250 mg (Abiraterone)प्रोस्टेट कॅन्सर₹४१,२५०.००₹३,२१८.२३९२% कपात
DenOsteoRel 60 mg (Denosumab)हाडांचा / स्तन व प्रोस्टेट कॅन्सर₹२४,९५५.००₹६,२४०.००७५% कपात
LUPIHER 2 420 mg (Pertuzumab)ब्रेस्ट (स्तन) कॅन्सर₹८३,५२०.००₹३७,३५८.३५५५% कपात
AZADINE 100 mg (Azacitidine)ब्लड (रक्त) कॅन्सर₹५,९६४.७०₹१,१९९.५०८०% कपात
PEG FILTERO 6 mg (Pegfilgrastim)इन्फेक्शन / न्यूट्रोपेनिया प्रतिबंध₹९,०९३.००₹१,६३१.००८२% कपात
Bryxta 100 mg (Bevacizumab)फुफ्फुस, स्वादुपिंड, गर्भाशय कॅन्सर₹२५,९९५.००₹३,३१८.००८७% कपात
ANARZOLE 1 mg (Anastrozole)ब्रेस्ट (स्तन) कॅन्सर₹६९५.७६₹७३.००९०% कपात

औषध विक्रेत्याने जास्त दर आकारल्यास ‘या’ नंबरवर करा तक्रार

वैद्यकीय दुकानात किंवा हॉस्पिटलमधील मेडिकल स्टोअरमध्ये ही औषधे कमी किमतीत (नवीन MRP नुसार) दिली जात नसतील किंवा जुन्याच अधिक दराने विकली जात असतील, तर नागरिक केंद्र सरकारकडे थेट तक्रार नोंदवू शकतात.

तक्रारीसाठी अधिकृत हेल्प सेंटर नंबर:

  • NPPA टोल-फ्री हेल्पलाइन: 1800-11-1255

  • राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (National Consumer Helpline): 1915 किंवा 1800-11-4000

  • अधिकृत ई-मेल तक्रार: pharmacomp-nppa@gov.in

ऑनलाईन तक्रार कशी करावी?

१. औषध खरेदी करताना मेडिकल स्टोअरकडून पक्के बिल (GST Bill) नक्की मागून घ्या.

२. मोबाईलवर ‘Pharma Sahi Daam’ ॲप डाउनलोड करून औषधाची खरी व नवीन कमाल विक्री किंमत (MRP) तपासा.

App Link : https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.app.searchmedicineprice&pcampaignid=web_share

Pharma Sahi Daam : https://nppa.gov.in/en/pharma_sahi_daam

३. जर औषध विक्रेत्याने MRP पेक्षा जास्त दर आकारला, तर बिलाच्या फोटोसह ‘Pharma Jan Samadhan’ पोर्टलवर तक्रार दाखल करा.

Pharma Jan Samadhan : https://nppaipdms.gov.in/NPPA/PharmaJanSamadhan/registration

(सर्व ताज्या बातम्या, महत्त्वपूर्ण शासकीय निर्णय आणि जनहितार्थ माहितीसाठी वाचत राहा no1marathinews.com)