नाशिकच्या पवित्र भूमीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सिंहस्थ महाकुंभ २०२७ च्या धर्मध्वजारोहणाचा शुभारंभ; गोदातीरावरून देशवासीयांना मार्गदर्शननाशिक: भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नासिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभ २०२७ च्या अनुषंगाने आयोजित विशेष कार्यक्रमात सहभाग घेत गोदातीरावरून देशवासीयांना संबोधित केले सिंहस्थ महाकुंभ २०२७ च्या पूर्वतयारीनिमित्त धर्मध्वजारोहण आणि विविध पवित्र अनुष्ठानांमध्ये राष्ट्रपतींनी सहभाग घेतला यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन पूजन केले. सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त आदरांजलीभाषण सुरू करताना राष्ट्रपती मुर्मू यांनी देशवासीयांना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त (राष्ट्रीय एकता दिवस) शुभेच्छा दिल्या. आधुनिक भारताचे शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांनी कृतज्ञ देशवासीयांच्या वतीने आदरांजली अर्पण केली .कुंभमेळ्याची प्राचीन परंपरा आणि सांस्कृतिक एकात्मताकुंभमेळ्याच्या महात्म्याविषयी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक येथील गोदावरीच्या तटावर भरणारे कुंभ समागम संपूर्ण जगभरात विख्यात आहेत १४०० वर्षांपूर्वी सम्राट हर्षवर्धन यांच्या काळातील नोंदींमध्येही अशा धार्मिक मेळ्यांचा उल्लेख आढळतो हा महाकुंभमेळा आपली प्राचीन सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा, तसेच सामाजिक समरसतेचा संदेश संपूर्ण जगाला देतो २०२७ चा सिंहस्थ महाकुंभ आपली प्राचीन विरासत आधुनिक अंगांनी जोडणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .महाराष्ट्र ही शूरवीरांची, संतांची आणि समरसतेची भूमीमहाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख करताना राष्ट्रपतींनी छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, चापेकर बंधू, तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला. महिलांचे शिक्षण आणि वंचित घटकांच्या विकासात महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशा दाखवली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, गोदावरी आरतीमध्ये ६०० ते ६५0 गावांमधील जनजातीय बांधवांच्या मोठ्या सहभागाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.पर्यावरण संरक्षण आणि शेतकरी कल्याणावर भरसध्याच्या हवामानातील बदलांमुळे (Extreme Weather Conditions) व दुष्काळी परिस्थितीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या पाठीशी केंद्र व राज्य सरकार खंबीरपणे उभे असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. तसेच, सिंहस्थ महाकुंभ दरम्यान स्वच्छता आणि वेस्ट मॅनेजमेंटचे उत्कृष्ट उदाहरण सादर होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सर्वांना पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.या कार्यक्रमास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ( विष्णू देव वर्मा ), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि इतर मंत्रिमंडळ सदस्य व मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपतींनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, भगवान श्री राम आणि माता गोदावरीच्या चरणी देशवासीयांच्या समृद्धी व कल्याणासाठी प्रार्थना केली Post navigation‘ज्ञानवेश कुमार यांना वाचवणे सरकारसाठी प्रधान यांच्यापेक्षा कितीतरी पटीने महत्त्वाचे!’; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा CBSE Board Exam 2027: सीबीएसई बोर्डाच्या १० वी आणि १२ वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; १६ फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू होणार!