New Delhi : बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान आहे. महाबोधी महाविहारच्या व्यवस्थापनातील चेअरमन व सर्व विश्वस्त बौद्ध धर्मीय असावेत, ही देशभरातील बौद्ध समाजाची मागणी आहे.

ही मागणी कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून, भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र धम्मस्थळाचे व्यवस्थापन बौद्धांकडे असावे, या न्याय्य भावनेतून आहे.

महाबोधी महाविहार टेम्पल ॲक्ट, 1949 मध्ये आवश्यक दुरुस्ती करून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी मी मा. अमित शाह जी यांच्याकडे केली.

मा. गृहमंत्री अमित शाह जी यांनी महाबोधी महाविहारचा संपूर्ण इतिहास व प्रकरणाची माहिती घेऊन याचा सखोल अभ्यास करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या सूचनेनुसार आज ही महत्त्वपूर्ण भेट झाली. देशभरातील बौद्ध समाजाच्या भावना आणि श्रद्धेचा सन्मान राखत महाबोधी महाविहार मुक्तीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, हीच माझी अपेक्षा. असे मा रामदास आठवले साहेब यांच्या वतीने प्रसिद्धी पत्रात कळवण्यात आले

#MahabodhiMahavihar #BuddhGaya #Buddhist #JaiBhim