अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाला विदेशी संशोधकांनी भेट देऊन विभागातील संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांशी संवाद साधला. यावेळी समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ.के.बी. नायक, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. वर्षा नाठार, डॉ.के.सी. मोरे उपस्थित होते. याप्रसंगी विदेशी संशोधक प्रसार माध्यम एक्सपर्ट जस्मिन सुंग (जर्मनी), मेडिकल एक्सपर्ट ग्रेस एम (युएसए), स्त्री अभ्यास एक्स्पर्ट इस्थरजी (बोस्टन अमेरिका) व वैज्ञानिक मर्षी प्रभुदास (सिंगापूर) यांनी विविध सामाजिक, आर्थिक आणि ग्रामीण प्रश्नांवर समाजशास्त्र विभागातील सर्व संशोधक व पदव्युत्तर विद्याथ्र्यांशी सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान विदेशी संशोधक एक्सपर्ट यांनी संशोधक विद्याथ्र्यांशी चर्चा करून त्यांच्या संशोधनाविषयी माहिती जाणून घेतली.यावेळी आदिवासी कुटुंबाच्या समस्यां, शेतकयांची ग्रामीण व नागरी भागातील सामाजिक आणि आर्थिक समस्यां तसेच भारतीय समाजावर पडलेला आय.सी.टी व सोशल मीडियाचा प्रभाव आदी विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. या संवादामुळे समाजशास्त्र विभागातील संशोधक विद्याथ्र्यांना व प्राध्यापकांना नवीन संशोधन दृष्टिकोन मिळाला. विविध सामाजिक प्रश्नांवर संशोधनाच्या माध्यमातून उपाय शोधण्यासाठी अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या संवादाचे अधिक महत्त्व असून या भेटीमुळे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाच्या संशोधन कार्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवीन दिशा मिळण्यास मदत होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ.के.बी. नायक, अतिथींचा परिचर डॉ. वर्षा नाठार, सूत्रसंचालन प्रा.डॉ. रोहिणी देशमुख यांनी, तर आभार डॉ. रोहिणी देशमुख यांनी मानले. या भेटीदरम्यान विभागातील शिक्षक, संशोधक व विद्यार्थी उपस्थित होते. Post navigationMaharashtra School Bag Policy: वर्षातून १० दिवस दप्तरांना सुट्टी; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीस्थळ घोषित करण्याची मागणी