‘उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत ‘मिशन ग्रीन मान्सून टप्पा – ११’ आणि ‘कुंभ युवा संवाद’ हा प्रेरणादायी उपक्रम भोंसला मिलिटरी कॉलेज कॅम्पस येथे राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणाईच्या उत्स्फूर्त सहभागात संपन्न झाला.

यावेळी नाशिकच्या भू-प्रहरींचा तसेच नामांकित युवा इन्फ्लुएन्सर्सचा विशेष सत्कार करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा वारसा पुढील पिढीकडे सोपवण्यासाठी पालकमंत्री महोदयांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात रोपांचे वाटप करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाची शपथ आणि व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेत हरित, निरोगी आणि समृद्ध नाशिक घडवण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमास आमदार सौ. सीमाताई हिरे, पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, कुंभमेळा आयुक्त श्री. शेखर सिंह, अभिनेते चिन्मय उदगीरकर, स्थायी समिती सभापती श्री. मच्छिंद्रभाऊ सानप, भाजपा गटनेते श्री. श्याम बडोदे, पश्चिम प्रभाग सभापती श्री. सुरेशअण्णा पाटील, सातपूर प्रभाग सभापती श्री. समाधान देवरे, माजी आमदार श्री. बाळासाहेब सानप, सौ. रोहिणी नायडू, श्री. लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष श्री. सुनील केदार, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ. स्वाती भामरे, श्री. सुनील बच्छाव, श्री. राजेश पंडित, श्री. मनोज साठे, श्री. चंद्रशेखर पाटील, भोंसला विभागीय अध्यक्ष श्री. संजयजी पगारे, सदस्य श्री. नरेंद्र वाणी, श्री. मनोहर शिंदे, सौ. शीतल देशपांडे यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

नाशिकच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरुणाईची ऊर्जा आणि पर्यावरण संवर्धनाची दिशा एकत्र आली, तर परिवर्तन निश्चित आहे! चला, ‘सशक्त युवा–हरित नाशिक’चा संकल्प लोकचळवळ बनवूया!

#UnnatNashik #MissionGreenMonsoon #GreenNashik #HimgauriAherAdke #mayorofnashik